पाऊस का पडतो? हा प्रश्न सगळ्यांना कधीनाकधी पडतोच. तर नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया....
![]() |
Photo by SHAH Shah on Unsplash |
पाऊस म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं म्हणजे गरमागरम कांदा भज्जी आणि सोबत एक कप चहा. वाह! ही भावना शब्दातही व्यक्त नाही करता येणार इतकी सुखद गोष्ट असते ही. पण लहानांसाठी पाऊस म्हणजे मस्त पावसात भिजायचे व कागदाने बनवलेली नाव वाहणाऱ्या पाण्यात सोडायचे आणि त्यात हि स्पर्धा लावायची कोणाची नाव सगळ्यात पुढे. पाऊस सुरु झाला की सगळीकडे आनंदमयी वातावरण सुरु होतो. कारण खूप गर्मीनंतर हा थंडावा सगळ्यांनाच सुखद वाटतो. घरोघरी पावसाच्या चपला, छत्री, रेनकोट, इत्यादी सामान घ्यायची तयारी सुरु होते.
पण हा पाऊस का पडतो हा प्रश्न सगळ्यांच्या मनात कधी ना कधी उद्भवलाच असेल. मला आजही आठवतं की लहान असताना आम्ही भाऊ-बहिणी एकत्र हात पकडायचो आणि गोल फेऱ्या मारत 'ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा........' गायचो. आणि जेव्हा कधी कोणाला विचारला की पाऊस कसा येतो का येतो? तर त्याचा उत्तर नेहमी वेगवेगळा असायचं. काहींना आजही माहित नसेल की नेमका हा पाऊस का व कसा पडतो. चला तर मग बघूया याच्यामागचे कारण नेमके आहे तरी काय?
सूर्याच्या किरणांमुळे म्हणजेच उन्हामुळे जमीन तापते व हवा उबदार होते. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील नद्या, तलाव, समुद्र किंवा भूजल यातील पाण्याच्या बाष्पीकरणाच्या क्रियेमुळे वाफ निर्माण होते व ती वाफ वातावरणात असलेल्या बारीक कणांना सोबत धरते. जसजसे बाष्प वर जाते तसतसे वायूतील थेम्ब थंड होत जाते. मग हवेतील पाण्याची वाफ हे ढगाचे स्वरूप घेते. जर हवा जास्त प्रमाणात वाढली तर हेच ढंगातील पाण्याचे वाफ बर्फाच्या क्रिस्टल्समध्ये बदलू शकते. जेव्हा पुरेसे संक्षेपण होते तेव्हा एक ढग तयार होतो जो कोट्यावधी पाण्याच्या थेंबाने बनलेला असतो. अखेरीस हवेतील पाण्याचे प्रवाह हवेच्या वाढत्या प्रवाहांमुळे व थंड तापमानामुळे साचलेले राहणे खूपच जड होते आणि ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवर पडते. जेव्हा त्याचे तापमान अजून थंड होते तेव्हा पाउसाऐवजी बर्फ किंवा गारा पडतात. डोंगराळ भागात पाऊस, बर्फ किंवा गारा जास्त प्रमाणात पडतात कारण तिथली हवा खूप थंड असते.
0 Comments