आमच्याबद्दल काही...
सर्वात आधी तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आमच्या ब्लॉग वर. तसं तर या ब्लॉग च्या नावातूनच या ब्लॉग विषयी एक कल्पना आपणास मिळाली असेल. InMarathiPro हे नाव ठेवण्यामागची कल्पना एवढीच होती की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मराठीत पोहचावी.
आज इंटरनेट माध्यम इतके प्रगत झाले आहे की आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सहज मिळून जातात. मग ती माहिती एखाद्या वस्तू विषयी असो, जागेविषयी, लोकांविषयी असो, बातमी किंवा इत्यादी. सगळी माहिती आपणास सहज मिळते. पण, आज इंटरनेट वर जेवढी माहिती उपलब्ध आहे ती जास्त प्रमाणात इंग्रजी आणि हिंदी भाषेत आहे. या भाषांत आपल्याला माहिती सहज मिळून जाते पण मराठी भाषिक व्यक्तींचं काय? ज्यांना इंग्रजी व हिंदी मध्ये नीट समजत नाही त्यांनी काय करावं? त्यांना कुठून माहिती मिळेल? हे सगळे घटक विचारात घेऊन हा ब्लॉग सुरु करत आहोत. जेणेकरून जास्तीत जास्त माहिती केवळ मराठी भाषिकांनाच नव्हे तर ज्यांना ही मराठी भाषेत माहिती हवी असेल त्यांना ती सहजपणे उपलब्ध व्हावी.
तुम्हाला या ब्लॉग मध्ये आम्ही पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करू. यात तुम्हाला केवळ रोमांचक,मनोरंजकच नव्हे तर शिक्षणासाठी उपयोगी ही काही ब्लॉग्स मिळतील म्हणजेच जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणीही जर सिविल सर्विस, बँकिंग साठी अभ्यास करत असाल तर एकदा हा ब्लॉग जरूर वाचा व तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा कळवा जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग होईल. त्याचसोबत आपल्या देशात व इतर देशात घडणाऱ्या व असणाऱ्या अद्भुतरम्य गोष्टी, सौंदर्य, वेगळेपणा, भारावून टाकणारे घटक, इत्यादी हे सगळं तुमच्यापर्यंत पोहचावे यासाठी हा ब्लॉग सुरु करण्यात आला आहे.
जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर या ब्लॉग मध्ये सापडत नसतील तर तुम्ही आम्हाला कंमेंट सेकशन मध्ये तो प्रश्न कळवू शकता किंवा inmarathipro@gmail.com यावर सुद्धा मेल करू शकता. आम्ही जरूर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्यापर्यंत पोहचवू. या ब्लॉगच्या माध्यमातूम तुमच्यापर्यंत Quality Content पोहचावी म्हणजेच उत्कृष्ट माहिती पोहचावी हाच आमचा ध्येय आहे.
0 Comments