Header Ads Widget

फोनपे वर भीम यूपीआय पिन कसा बदलायचा?/ How to change BHIM UPI pin on PhonePe app?

फोनपे वर भीम यूपीआय पिन कसा बदलायचा?


भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) एक पेमेंट अ‍ॅप आहे जे आपल्याला युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा वापर करून सोपा, सुलभ आणि द्रुत व्यवहार करू देते. आपण यूपीआय वरील कोणासही त्यांचा यूपीआय आयडी वापरुन किंवा थेट बीएचआयएम अ‍ॅपद्वारे त्यांचे QR CODE स्कॅन करुन थेट बँक पेमेंट करू शकता. आपण यूपीआय आयडीवरून अ‍ॅपद्वारे पैशाची विनंती देखील करू शकता. BHIM (भारत इंटरफेस फॉर मनी) अ‍ॅप ​​कॅशलेस पेमेंट्स सुलभ करण्यासाठी भारत सरकारचा एक उपक्रम आहे. अ‍ॅप दोन बँक खात्यांमधील पैशांच्या हस्तांतरणास सुलभ करते आणि सेवेचा वापर करून व्यापाऱ्यांना थेट देय देण्यास वापरकर्त्यास परवानगी देतो. पण कोणाला ही पैसे पाठवण्याच्या युपीआय पिन टाकणं महत्त्वाचा असता. त्याशिवाय कोणतेही व्यवहार करता येत नाहीत. असा हा फोनपे वर भीम यूपीआय पिन कसा बदलायचा? याचे उत्तर तुंहाला इथे मिळेल.

 फोनपे वर भीम यूपीआय पिन कसा बदलायचा?

1) तुमच्या मोबाइल चे इंटरनेट चालू केल्यावर फोनेपे अ‍ॅप लॉगिन करून चालू करा. जसा तो अ‍ॅप चालू होईल तर समोर असलेल्या होमस्क्रीन वर एक्दम खालच्या बाजूला तुम्हाला माय मनी/ My Money पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

2) पेमेंट मेथड विभागाखाली बँक अकाउंट्स / Bank Accounts हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. तुमच्या समोर एक स्क्रीन येईल ज्यात तुम्ही लिंक केलेला/केलेले बँक अकाउंट तुम्हाला दिसेल/दिसतील. तिथेच BHIM UPI पिन बदल/ Change BHIM UPI Pin असे लिहिले असेल त्यावर क्लिक करा.

3) आता तुमच्या समोर एक नवीन स्क्रीन येईल ज्यात तुमचे जुने युपीआय पिन टाकण्यास सांगितले जाईल, तिथे तुमचे जुने युपीआय पिन प्रविष्ट करा. त्याच्याच खाली नवीन युपीआय पिन टाकण्यास सांगितले जाईल तिथे नवीन कोणतेही चार अंकी युपीआय पिन प्रविष्ट करा.

4) नवीन युपीआय पिन टाकल्यावर खाली असे (✔️) चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा. अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा युपीआय पिन बदल करू शकता.

Post a Comment

0 Comments