Header Ads Widget

फोनपे ऍप वर भाषा कशी निवडावी / बदलावी? / How to change or set language on Phonepe app?

 फोनपे ऍप वर भाषा कशी निवडावी / बदलावी?


कोणताही ऍप सहज वापरण्यासाठी आपल्याला त्या ऍप मधली भाषा ही आपल्याला समजेल अशी असावी लागते. मुख्यतः जास्तीत जास्त अँप ची डिफॉल्ट भाषा हि इंग्रजी सेट केलेली असते. पण सगळ्यांनाच इंग्रजी भाषा कळते असं नाही. म्हणूनच फोनपे अँपमध्येसुद्धा इंग्रजी भाषा वगळून अजून १० भाषा दिल्या गेल्या आहेत जेणेकरून तुम्ही फोनपे वरून तुम्हाला समजेल त्या भाषेत व्यवहार करू शकता. म्हणूनच फोनपे ऍप वर भाषा कशी निवडावी / बदलावी? याचे उत्तर तुम्हाला इथे मिळेल.

 फोनपे वर भाषा निवडण्यासाठी / बदलण्यासाठी आपण खालील चरणांचे अनुसरण करू शकता:

1) तुमच्या मोबाइल चे इंटरनेट चालू केल्यावर फोनेपे ऍप चालू करा. जसा तो ऍप चालू होईल तर समोर असलेल्या होमस्क्रीन वर अगदी वरच्या बाजूला डावीकडे तुम्हाला गोल चिन्ह दिसेल ज्यात फोटो असेल त्याला प्रोफाइल मेन्यू बोलतात. त्यावर क्लिक करा.

2) से तुम्ही त्यावर क्लिक कराल तिथे तुम्हाला माझी भाषा/My Language असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

3) त्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर ११ वेगवेगळ्या भाषा दिसतील. त्यातली तुम्हाला जी भाषा निवडायची असेल त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर खाली Continue / चालू ठेवा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. 


अशाप्रकारे तुम्ही फोनपे अँप ची भाषा अगदी सहजपणे एका मिनिटात बदलू शकता. 


Post a Comment

0 Comments