आग्रा किल्ला /Agra Fort
आपल्या भारतात बरीच इतिहासकालीन ऐतिहासिक स्थळे पाहायला मिळतात.इतिहासात सर्वात जास्त काळ भरतात सत्ता गाजवणाऱ्या सत्ताधाऱ्यांपैकी एक म्हणजेच मुघल. मुघलांनी ज्या ज्या ठिकाणी आपली सत्ता स्थापण केली त्या त्या ठिकाणी त्यांनी आपले किल्ले बांधले होते. त्यांची सत्ता स्थापण करण्याची सुरवात झाली ती, दिल्ली पासून.
उत्तर भारतातील उत्तर प्रदेशा राज्यात असलेले आग्रा हे जगप्रसिद्ध शहर युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या तीन साईटस असलेले भारतातील बहुदा एकमेव शहर आहे.
देशाची राजधानी दिल्लीपासून २०० किमी अंतरावर उत्तर प्रदेश शहर हा तिथे असलेल्या ताजमहालसाठी ओळखले जाते. येथे स्थित ताजमहालव्यतिरिक्त, आग्रा किल्ला आणि फतेहपूर सीकरी यांचा देखील युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात समावेश आहे. आग्राचा इतिहास ११ व्या शतकाचा आहे. वर्षानुवर्षे येथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही राज्यकर्ते राज्य करीत होते. म्हणूनच, दोन प्रकारच्या संस्कृतीचा संगम येथे दिसतो.
आग्रा किल्ला, लाल किल्ला, किला-ए-अकबरी किंवा किला रौज म्हणून देखील ओळखला जातो. आग्रा किल्ला उत्तर प्रदेशातील आग्रा येथे यमुना नदीच्या उजव्या किनाऱ्यावर एक विशाल किल्ला असून जगातील प्रसिद्ध ताजमहालपासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर आहे.
हा भव्य किल्ला त्याच्या भव्यतेबरोबर अनेक चमत्कृतीनी भरलेला आहे. हा किल्ला ९४ एकर जागेत पसरलेला आहे आणि ह्याचे बांधकाम अर्धवर्तुळाकार असून ते यमुना नदीला समांतर आहे. ह्याच्या तटाची उंची ७० फुट असून त्याला चार दरवाजे आहेत. त्यांपैकी दोन महत्वाचे दरवाजे आहेत, संगमरवरीचा बाहेरचा दरवाजा आणि आत दोन मोठे हत्तींचे पुतळे आहेत. ते सुरक्षिततेसाठी ठेवले आहेत. दरवाजाची रचना सहजा सहजी शत्रूला आत येऊ न देण्याकरिता केली आहे आणि लाहोर गेट ला अमरसिंग राठोड चे नाव दिले आहे.
मीनाबाजार, शहाजहान महाल, दिवाण-ए-खास, दिवाण-ए-आम असे भव्य दरबार आहेत. भव्यता हा मुघल वास्तुकलेचा आत्मा आहे.
आग्राचा किल्ला मोगलांनी बनवलेल्या सर्वात खास स्मारकांपैकी एक असून यामध्ये भव्य रचना आहे. हे मोगल-शैलीतील कला आणि वास्तुकलेचे एक अचूक उदाहरण आहे आणि आग्रा येथील पर्यटन स्थळांपैकी हे एक सर्वाधिक लोकप्रिय स्थळ आहे. पूर्णपणे लाल वाळूचा खडकांनी बांधलेल्या गडाच्या परिसरामध्ये पर्ल मशिदी, दिवाण-खास, दिवाण-आम, मोती मशिद आणि जहांगीरी महल ही काही उत्तम मोगल वास्तुकला आहेत. हा किल्ला मुघलकालीन काळात बनलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक मुख्य किल्ला आहे. या किल्ल्यावर केल्या गेलेल्या रेखीव व कोरीव स्वरूपातील विलक्षण नक्षीदार कामगिरीमुळे युनेस्कोने या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले आहे.
0 Comments