दिवाळी/Diwali Festival
![]() |
Photo by Madhukar Kumar on Unsplash दिवाळी – एक असा सण जो भारतात साजरा केला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा व सगळ्यांचा आवडता मानला जातो. भारतातच नाही तर इतर देशातल्या लोकांना सुद्धा हा सण खूप आवडतो. लहानांची तर या सणाला मज्जाच असते कारण तेव्हा त्यांना शालेला सुट्टी असते. आणि दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, फराळ, नवीन फटाके, इत्यादी बघायला मिळतात. घराबाहेर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांची रांगोळी आणि सोबतच निरनिराळ्या रंगांचे पणत्या, कंदील इत्यादी याने प्रत्येकाचे घर सुशोभित दिसते. दिवाळी (संस्कृतमधील दीपावली) चा शब्दशः अर्थ “दिव्यांची एक पंक्ती” असा होतो. हा पाच दिवसांचा सण, जो भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो, अंधकारापेक्षा चांगल्या आणि विजयाच्या सन्मानाची जाणिव व्यक्त करणारा हा सण आहे. उत्तर भारतात, भगवान राम आणि त्यांची पत्नी सीता यांचा त्यांच्या अयोध्या राज्यात परत जाण्याचा उत्सवम्हणून साजरा केला जातो. दक्षिण भारतात, सण नरकासुर राक्षसाच्या पराभवाशी संबंधित आहे. दिवाळी, दीपावली हा दीपोत्सवाचा हिंदू सण आहे, हा सहसा पाच दिवस चालतो आणि आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा केला जातो. हा सण दिवाळी संपुर्ण भारतात सर्व धर्मीय लोक मोठ्या उल्हासात साजरा करतात. “दिवाळी” रोषणाई, आनंदाचा, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. भेटवस्तू आणि मिठाई घेऊन कुटुंबे एकमेकांना भेट देतात. घरे व कार्यालयीन परिसराला साफसफाई करुन सजविले जाते. फिकट फटाके, आणि घरातील मेजवानीत मिठाई (मिठाई) आणि भेटवस्तू सामायिक केल्या जातात. "दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई-म्हशी कुनाच्या,लक्षुमनाच्या, लक्षुमन कुनाचा, आई-बापाचा...." असे गाणे आधी दिवाळीच्या वेळी गायिले जात. हे गाणं आपल्याला गावी जास्त ऐकायला मिळते किंवा जर कुणी आपले वयस्कर आजी आजोबा असतील तर ते सुद्धा हे गाणे म्हणताना आपण पाहू शकतो. यात गाई म्हशींचा संदर्भ यासाठी की गावी कृषिप्रधान संस्कृती जास्त होती. तर तेव्हा दिवाळी आपल्या गाई म्हशींबरोबर साजरी करण्याची पद्धत होती. आताही काही भागात ती साजरी केली जाते.गावाकडे दिवाळी हा गत वर्षभरात निसर्गाने आपल्यावर केलेल्या कृपेला स्मरून, नवीन वर्षांतही अशीच कृपा आमच्यावर ठेव असं सांगत निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा असतो. भारतात, लोकं आपले घर स्वच्छ करतात आणि नवीन कपडे खरेदी करतात. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. वैयक्तिक पातळीवर, दिवाळी हा आपल्या मनातील काळोख आणि वैयक्तिक भुते विचार दूर करण्याचा सण आहे. आपल्यामध्ये प्रकाश चमकू द्या आणि हा प्रकाश बाहेरून देखील चमकू द्या असे या सणाचे उद्देश आहे याला नाकारता येत नाही. दिवाळीला आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात अशाप्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते कि रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते. त्याबरोबर घरात चारही बाजूंना तेलाचे दिपक एका रांगेत ठेवून घर सजवले जाते. त्यामुळे दिवाळी “दिपोत्सव” म्हणून ओळखली जाते.या दिवसासाठी बरेच लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. मुख्यतः महिला ह्या सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतात. तसं बघायला गेलं तर दिवाळी हा सण एक महिनाभराचा सण आहे असे म्हणण्यात हरकत नाही. कारण महिन्या आधीपासूनच घराची साफसफाई, दिवाळी चे फराळ बनवण्याची तयारी सुरु होते. पण मुख्य म्हणजे दिवाळीत मुख्य म्हणजे पाच दिवस असतात ते म्हणजे: धनत्रयोदशी धनतेरस हा पहिला दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात. “धन” म्हणजे संपत्ती आणि “तेरस” म्हणजे हिंदू कॅलेंडरवरील चंद्र पंधरवड्याच्या १३ व्या दिवसाचा अर्थ. हिंदु औषधी देवता आणि भगवान विष्णूचा अवतार भगवान धन्वंतरी यांनी या दिवशी मानवजातीसाठी आयुर्वेद आणि अमरत्व अमृत आणले आहेत असे म्हणतात. पौराणिक कथेत असेही आहे की या दिवशी समृद्धीची देवी लक्ष्मी हिचा समुद्र मंथनातून जन्म झाला होता. तिच्या स्वागतासाठी घरे स्वच्छ आणि सज्ज केली जातात. सोने आणि इतर धातू (स्वयंपाकघरातील भांडींसह) पारंपारिकपणे खरेदी केल्या जातात. काही भागात असे मानले जाते की यादिवशी जास्त खर्च नाही करायचा. अशाप्रकारे धनत्रयोदशी या सणामागे एक अजून मनोवेधक कथा आहे. हेमा राजाचा पुत्र हा सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चौथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही.त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या-चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात अशी आख्यायिका प्रचलित आहे. म्हणूनच या दिवशी यमदीपदान केले जाते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे दिले जाते (याला तेलुगूमध्ये गुडोदकम् म्हणतात.) यात मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही, असे काहीजणांची समजूत आहे. कडुनिंबाचे एवढे महत्त्व आहे, म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. नरकचतुर्दशी दुसरा दिवस दक्षिण भारतात नरकचतुर्दशी आणि उत्तर भारतात छोटी दिवाळी (छोटी दिवाळी) म्हणून ओळखला जातो. ह्या दिवशी भल्या पहाटे उठून, सूर्योदया अगोदरच स्नानादी कार्ये आटोपून तयार होण्याची परंपरा आहे. रांगोळी (हिंदू लोककला) घराच्या दारे आणि अंगणात तयार केली जाते. या दिवशी लोक घर रंगांनी सजवतात महिला हातांवर मेहंदी काढतात. दिवाळीची संपूर्ण तयारीचा आढावा घेतला जातो. लहान मुलांना उपहार दिले जातात. असे समजले जाते की नरकासुराने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व अवध्यत्वाचा – म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही – असा वर मागून घेतला. त्या वराच्या योगाने त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अश्या एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. त्याने अगणित संपत्ती लुटली व अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छ्त्रही बळकावले. त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता. भगवान कृष्ण आणि देवी काली यांनी नरकसुर या राक्षसाचा नाश केला आणि या दिवशी १६,००० बंदी स्त्रियांना मुक्त केले. गोव्यात हा दिवस साजरा करताना राक्षसाचे पुतळे मोठ्या प्रमाणात जाळले जातात. तिसऱ्या आणि मुख्य दिवशी, लक्ष्मीपूजन साजरा केला जातो. मातीचे बरेच दिवे पेटवून घरात व घराच्या बाहेर ठेवल्या जातात. पूजा रीतिरिवाजाने पूर्ण झाल्यावर देवतांच्या आगमनांच्या जल्लोषाला फटाके फोडून द्विगुणीत केले जाते. गोड पदार्थ खावू घातले जातात. एकमेकांना दिवाळीच्या मंगलमय शुभकामना दिल्या जातात या दिवशी व्यापारी व व्यावसायिक आपल्या दुकांनांमध्ये भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा करतात. कुटुंबे एकत्र जमतात आणि लक्ष्मीपूजन करतात आणि एकमेकांना भेटवस्तू आणि मिठाई देतात.अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ‘ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसाममध्येही काली पूजा साजरी केली जाते (जरी हे चंद्राच्या चक्रानुसार एक दिवस आधी पडते). भयानक अंधकारमय माता देवी, तिच्याबरोबर असलेल्या अहंकार आणि भ्रमांचा नाश करण्याच्या तिच्या क्षमतेसाठी पूजली जाते. बलिप्रतिपदा (पाडवा) कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखला जातो. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. व्यापारी या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच “दिवाळसण” म्हणतात. गोवर्धन पूजा उत्तर भारतात भगवान कृष्णाने इंद्र, पावसाच्या देवतांचा पराभव केल्याच्या स्मरणार्थ साजरी केली जाते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये राक्षसी राजा बाली वर भगवान विष्णूचा विजय, बलीप्रतिपदा किंवा बाली पद्यमी म्हणून साजरा केला जातो. भाऊबीज भाईदूज/भाऊबीज म्हणून ओळखला जाणारा पाचवा आणि शेवटचा दिवस बहिण व भाऊ यांच्यासाठी साजरा करण्यासाठी समर्पित आहे. हा दिवस भाऊ-बहिणीच्या अतूट आणि असीम प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. ह्या दिवशी बहिणी आपल्या भावाला दिव्यांच्या आरास आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी व भरभराटीची शुभकामना करतात. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन केले जाते व भावाला जेवायला बोलावले जाते आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो. भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.भाऊ बहिणीला छानसे उपहार देवून खुश करतो व आपल्या नात्याला अधिक मधुर बनवण्याचा प्रयत्न करतो. हा दिवस रक्षाबंधनाइतकाच पवित्र मानला जातो.▼ अशाप्रकारे दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला आपले एक महत्त्व आहे. दिवाळी म्हटली की फराळ डोळ्यासमोर येतो. फराळात कारंजी, शेव, चकली, लाडू, चिवडा, अनारसे, इत्यादी बनवले जाते. या फराळाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीचा पूजेला नैवेद्य म्हणून दाखवले जाते मग त्यानंतर एकमेकांना, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना दिला जातो. कित्येक दिवस हा फराळ घरात खाल्ला जातो. |
0 Comments