Header Ads Widget

काही लोकं झोपले की त्यांचा घोरण्याचा आवाज येतो… पण तो नेमका का येतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? / Why do people snore?

काही लोकं झोपले की त्यांचा घोरण्याचा आवाज येतो… पण तो नेमका का येतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?


रात्री गाढ झोपेत असताना अचानक कुठून तरी आवाज येतो आणि आपण कधी त्या आवाजाने अचानक दचकून उठतो तर कधी आपल्याला त्या आवाजामुळे खूप राग येतो व चिडचिड होते आणि आपली झोपमोड होते. हे नक्की सगळ्यांबरोबर कधी ना कधी झालंच असेल. आपल्या आसपास कोणी घोरत असलं की तो आवाज कधी कधी खूप असहाय्य होऊन जातो. पण लोकं नेमके का घोरतात आणि त्यांचा घोरण्याचा आवाज का येतो याचा कधी आपण विचार केला आहे का?

घोरणे एक सामान्य आवाज आहे जो आपल्या फुफ्फुसात येत असतो पण बऱ्याच लोंकाना असे वाटते की, तो आवाज नाकातून येत आहे. जवळजवळ प्रत्येकजण घोरतो, परंतु काही लोकांसाठी ही एक तीव्र समस्या असू शकते. आपल्या जिभेच्या पाठीमागे ओरोफॅरिक्स असते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा ओरोफॅरिक्स तंग(तिघात) होऊन जातो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा फुफ्फस पूर्णपणे उघडे असते आणि बाकी स्नायू आराम करत असतात. आणि जेव्हा आपण गाढ झोपेत असताना स्वप्न बघतो तेव्हा श्वास घेण्याच्या वेळी हवा जाण्याचा रस्ता छोटा होऊन जातो. आणि त्यामुळे हवेचा दबाव वाढायला लागतो. आणि गळ्याच्या मागे जे टिश्श्यू असतात ते व्हायब्रेट व्हायला लागतात. त्यामुळे आपण घोरायला लागतो.

शरीरातील प्रत्येक क्रिया घडण्यामागे काही ना काही कारण असते. तसेच घोरण्यामागे काय कारणे आहेत ते पाहूया:

Image Source - Google | Image by - https://www.wallpaperflare.com/



झोपेत घोरण्याचे अनेक कारणे असू शकतात जसे की:
  • झोपेची कमतरता.
  • गळयाभोवती अतिरिक्त वजन असणे.
  • टॉन्सिल्स किंवा विस्तारित जीभ असलेले लोक.
  • लठ्ठपणा.

घोरणे कसे थांबवले जाऊ शकते?

  • वजन जास्त असल्यास वजन कमी करा: यामुळे घशातील ऊतकांची मात्रा कमी होण्यास मदत होईल ज्यामुळे आपल्या घोरण्याचा त्रास होतो.
  • झोपण्यापूर्वी मद्यपान मर्यादित करा किंवा शक्यतो टाळा.
  • पुरेशी झोप घ्या.
  • धूम्रपान करणे थांबवा : धूम्रपान केल्याने घोरण्याचे प्रमाण अधिक वाढू शकते.
  • भरपूर पाणी प्या: जेव्हा आपण डिहायड्रेट होता म्हणजेच कमी पाणी पिता तेव्हा आपल्या नाकातील स्राव आणि मऊ टाळू चिकट होतात.
  • आपली झोपेची स्थिती बदला: शक्यतो कुशीवर झोपा.

घोरणे हा बहुतेक वेळा निद्रा विकृतीशी संबंधित असतो ज्याला अवरोधक स्लीप एपनिया(Sleep apnea) किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (ओएसए) या नावानेसुद्धा ओळखले जाते.




सर्व घोरणाऱ्यांना ओएसए नसतो, परंतु जर खालीलपैकी कोणतेही लक्षणे जास्त प्रमाणात होत असतील तर ओएसएच्या पुढील मूल्यांकनासाठी डॉक्टरांना त्वरित भेट देणे गरजेचे आहे:

  • रात्री छातीत दुखणे
  • उच्च रक्तदाब
  • दिवसा जास्त झोप येणे
  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण
  • झोपेत असताना श्वास थांबणे
  • सकाळी डोकेदुखी
  • रात्रीच्या वेळी गुदमरण्यासारखे होणे.
  • जाग आल्यावर घसा खवखवणे

जस जसे तुमचे वय वाढत जाते तस तसे घोरण्याची क्षमता वाढत जाते. स्त्रियांपेक्षा जास्त पुरुष जास्त प्रमाणात घोरतात. ज्यांचे वजन जास्त असते त्यांची घोरण्याची शक्यता जास्त असते.

Post a Comment

0 Comments