भारतीय लोकनृत्य/INDIAN FOLK DANCE
![]() |
Image Source - Google | Image by - https://www.jagranjosh.com/ |
भारत देश हा नेहमीच सगळ्या जगभर लोकप्रिय व जास्त चर्चित देश आहे. कारण भारत हा असा देश आहे जिथे संस्कृती, भाषा, धर्म, जात-पंथ, चालीरीती इत्यादी एकमेकांपासून वेगळे असूनही लोक एकत्र राहतात. मग ते सण असो काही परंपरा असो किंवा नृत्यप्रकार असोत. जसे शास्त्रीय नृत्यप्रकार महत्त्वाचे आहेत तसेच लोकनृत्य पण तितकेच महत्त्वाचे आहेत. लोकनृत्य म्हणजे असे नृत्य जे एखाद्या विशिष्ट देश किंवा प्रदेशातील लोकांचे जीवन प्रतिबिंबित करणारे व लोकांद्वारे विकसित केले गेलेले होय. लोक नृत्य संख्या आणि शैलीमध्ये असंख्य आहेत आणि संबंधित राज्यातील स्थानिक परंपरेनुसार, वांशिक किंवा भौगोलिक प्रदेशांमध्ये भिन्न आहेत. लोक नृत्याची विशेष बाब ही आहे की हा नृत्यप्रकार प्रत्येक जागेवर असणाऱ्या लोकांच्या परंपरा, चालीरीती, इत्यादींचे सादरीकरण नृत्याद्वारे केले जाते जे खूपच मनोरंजक वाटते.
भारतात अनेक राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यात वेगवेगळे लोक नृत्य असतात. अशाच काही लोकनृत्याची नावे आपण पाहूया:
- आंध्र प्रदेश – विलासिनी नाट्यम, कुचीपुडी, आंध्र नाट्यम, भामकल्पम, वीरनाट्यम, दप्पू, तप्पेता गुल्लू, लांबाडी, ढिम्सा, कोलट्टम, बुट्टा बोम्मालू.
- अरुणाचल प्रदेश – बुईया, चलो, वानचो, पासी कोंकी, पोणुंग, पोपीर, बारडो छम
- आसाम – बिहू, बिच्छुआ, नटपुजा, महारस, कालिगोपाल, बागुरंबा, नागा नृत्य, खेल गोपाळ, तबल चोंगली, कॅनो, झुमुरा होबजनाई
- बिहार – जत जतीन, बाखो-बखाइन, पंवारिया, समा चकवा, बिदेसिया
- छत्तीसगड – गौर मारिया, पंथी, राऊत नाचा, पांडवानी, वेदमती, कपालिक, भरथरी चरित, चांदैनी
- गुजरात – गरबा, दांडिया रास, टिपणी ज्युरुन, भवई
- गोवा – तरंगमेल, कोळी, देखनी, फुगडी, शिग्मो, घोडेमोडनी, समयी नृत्य, जागर, रानमाळे, गोन्फ, टोन्या मेळ
- हरियाणा – झुमर, फाग, डाफ, धामाळ, लौर, गुग्गा, खोर, गागोर
- हिमाचल प्रदेश – झोरा, झाली, चारी, धामण, छापली, महासू, नाटी, डांगी
- जम्मू आणि काश्मीर – रऊफ, हिकट, मांडजस, कुड दांडी नाच, दमाली
- झारखंड – अल्काप, कर्मा मुंडा, अग्नि, झुमर, जानी झुमर, मर्दाना झुमर, पायका, फागुआ, हंता नृत्य, मुंदारी नृत्य, सरहुल, बड़व, झिटका, डांगा, डोमकाच, घोरा नाच, छाऊ(अर्ध शास्त्रीय)
- कर्नाटक – यक्षगाना, हुत्तारी, सुग्गी, कुनिठा, कर्गा, लांबी
- केरळा – ओट्टम थुल्लल, कैकोटिकली (कथकली (शास्त्रीय), मोहिनीअट्टम
- महाराष्ट्र – लावणी, नाकाटा, कोळी, लेझीम, गफा, दहिकाला दशावतार (बोहाडा)
- मध्य प्रदेश – जवारा, मटकी, आडा, खडा नाच, फुलपती, ग्रीडा डान्स, सेल्लारकी, सेलाभाडोनी, मांच
- मणिपूर – डोल चोलम, थांग ता, लाई हरोबा, पुंग चोलोम, खंबा थाईबी, नूपा डान्स, रासलीला, खुबक ईशी, ल्हो शा
- मेघालय – का शाद सुक मायन्सीम, नॉन्गक्रीम, लाहो
- मिझोरम – चेरॉ डान्स, खुल्लम, चाईलं, सावलाकीन, चाँगलाइझॉन, झांगतलाम, पार लाम, सरलंकाई / सोलकीया, तेलंगलाम
- नागालँड – रंगमा, बांबू डान्स, झेलियांग, न्सुइरोलियन्स, जेथिंगलीम, टेमॅग्नेटिन, हेतालेली
- ओडिशा – सावरी, घुमारा, पेनका, मुनारी (ओडिसी (शास्त्रीय), छाऊ
- पंजाब – भांगडा, गिधा, डाफ, धामण, भांड, नकल
- राजस्थान – घुमार, चक्री, गणगोर, झुलन लीला, झुमा, सुईसिनी, घापल, कलबेलिया
- सिक्किम – चु फाट, सिकमारी, सिंघी चाम किंवा बर्फाचा सिंह, याक चाम, डेन्झॉन्ग गेंन्हा, ताशी यांगकु, खुकुरी नाच, चुटकी नाच, मारुनी नृत्य
- तामिळनाडू – कुमी, कोलट्टम, कावडी
- त्रिपुरा – होजागिरी
- उत्तर प्रदेश – नौटंकी, रासलीला, कजरी, झोरा, चप्पली, जैता
- उत्तराखंड – गाढवाली, कुमायूनी, कजरी, झोरा, रासलीला, चप्पली
- पश्चिम बंगाल – काठी, गंभीर, ढाली, जत्रा, बाऊल, मरासिया, महल, कीर्तन
- लक्षद्वीप – लावा, कोलकाली, परिचकली
0 Comments