लोहस्तंभ, दिल्ली(THE IRON PILLAR, DELHI)
भारताचा इतिहास खूप प्रचंड आहे. तसेच इतिहासातील घटना, ऐतिहासिक स्थळे, ऐतिहासिक वस्तू हे ही तितकेच महत्त्वाचे व कधी कधी प्रश्नात पडणारे आहेत. आज ही इतिहासातील काही स्थळे व वस्तू पाहून आपल्याला प्रश्न पडतात कि हे अजून ही इतक्या वर्षांनंतरही चांगल्या स्थितीत कसे? याचे बांधकाम, कोरीव काम कसे केले गेले असेल? हे सगळं करताना कोणती पद्धत व जिन्नस वापरले गेले असतील? शिवाय हे कसे बनवले गेले असेल? कोणी बनवले असेल? का बनवले असेल? असे अनेक प्रश्न मनात उद्भवतात. असेच प्रश्न आपल्याला दिल्ली मधल्या लोह स्तंभ ला बघून उद्धवतील. जेव्हा आपण लांबून हा स्तंभ पाहतो तेव्हा असे वाटते की हा इतर वास्तुकलांप्रमाणे एक साधारण स्तंभ आहे. पण जसजसे आपण जवळ जातो आणि त्याचा इतिहास बघतो तेव्हा विश्वास बसणार नाही एवढे आश्चर्य आपल्याला कळतात. दिल्लीचे लोखंडी खांब (कीर्ती किंवा विजय स्तंभ) जवळपास 24 फूट उंच असून दिल्लीतील मेहरौली येथील कव्वाट-उल मस्जिद येथे आहे, ज्याचे वजन 6 टनांपेक्षा जास्त आहे आणि ते 98% लोखंडापासून बनलेले आहे.
असे मानले जाते की दिल्लीचा हा लोखंड स्तंभ फोर्ज वेल्डिंगचा वापर करून तयार केला गेला होता. खांबावर असलेल्या पातळ फॉस्फरसच्या परतमुळे हा खांब अजून ही गंजला नाही असे म्हटले जाते. शिलालेखानुसार, राजा चंद्राने हा आधारस्तंभ आपले युद्धातील विजय साजरे करण्यासाठी बांधले होते आणि ते भगवान विष्णूला समर्पित केले होते. कुतुब कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली, भारत येथे असलेला हा लोखंडी खांब मूळत: राजा चंद्राच्या काळात उभारण्यात आला होता आणि त्यांचे संस्कृत भाषेचे शिलालेख आहेत. या राजाची ओळख गुप्ता घराण्याच्या सम्राट चंद्रगुप्त द्वितीय (इ.स. ३७५-४१३/१४ इ.स.) सह झाली आहे. असे मानले जाते की वरच्या बाजूला गुप्तांचे प्रतीक असलेल्या पौराणिक पक्ष गरुडचे प्रतीक आहे, परंतु आता ते पुसत झाले आहे व स्पष्टपणे दिसत नाही. खांबाची एकूण लांबी ७.२ मीटर आहे, त्यापैकी ९३ सेंटीमीटर खांब हा भूमिगत दफन केला गेला आहे.

हा ऐतिहासिक खांब शतकानुशतके सर्व हंगामात खुल्या आकाशाखाली १६०० पेक्षा जास्त वर्षांपासून स्थिर आहे. इतक्या वर्षांपासून याह बिलकुल ही गंज लागला नाही ही जगासाठी आश्चर्यकारक बाब आहे. या स्तंभाच्या इतिहासाचा विचार केला तर ते चौथ्या शतकात बांधले गेले. या खांबावरील संस्कृत शिलालेखानुसार तो ध्वजस्तंभ म्हणून उभारला गेला होता. चंद्रराजांनी मथुरा येथील विष्णू टेकडीवर बांधलेल्या भगवान विष्णूच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभ म्हणून तो उभारला होता. हे त्यावर गरुड स्थापित करण्यासाठी बांधले गेले असावे, म्हणून त्याला गरुड स्तंभ देखील म्हटले जाते. १०५० मध्ये हा स्तंभ दिल्लीचे संस्थापक अनंगपाल यांनी आणला होता. हा खांब ६.५ टन वजनाचा आहे आणि ४८ सेंमी व्यासाच्या कलात्मक कोरलेल्या बेसवर उभा आहे. खांबाचा वरचा भाग वरच्या बाजूस थोडासा अरुंद आहे, त्याचे टोक सुमारे २९ सेमी रुंद आहे. या खांबाचे वजन ५८६५ किलोपेक्षा जास्त आहे.
असा हा खांब आजही आपल्या जागेवर ठामपणे उभा आहे व इतिहासातील एक मोलाचा भाग मानला जातो. आजही आपण या ऐतिहासिक खांब ला जाऊन पाहू शकतो.
0 Comments